नवी मुंबई : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली महाराष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षनिरीक्षक संजय पाटील यांनी केले.
येत्या १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यभर झंझावाती प्रचार सुरू असून, विकास हाच पक्षाचा एकमेव अजेंडा असल्याचे पाटील यांनी सांगितले. नवी मुंबई शहर आज वेगाने विस्तारत असून आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, दळणवळण व्यवस्था, गृहनिर्माण, रोजगारनिर्मिती आणि स्मार्ट सिटी संकल्पनांमुळे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. या विकासाला योग्य दिशा देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी मुंबईच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आजवर अत्यंत महत्त्वाची राहिली असून, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीत पक्षाने नेहमीच निर्णायक योगदान दिले असल्याचे पाटील म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकास साधणे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज मा. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना नवी मुंबईसारख्या शहरासाठी भरघोस निधी, वेगवान निर्णयप्रक्रिया आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजन शक्य झाले आहे. शहराच्या पुढील टप्प्यातील विकासासाठी हे नेतृत्व अत्यंत आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हाच मतदारांसाठी विश्वासार्ह आणि विकासाभिमुख पर्याय असून, पक्षाचा प्रत्येक उमेदवार हा काम करणारा व जनतेशी थेट जोडलेला असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी मा. अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भरघोस मतदान करण्याचे आवाहन संजय पाटील यांनी नवी मुंबईकरांना केले.





