चिंदर पंचायत समिती मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार दीपक सुर्वे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळविला. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार समीर लब्दे यांचा त्यांनी अवघ्या ३१ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात निकाल शेवटच्या फेरीपर्यंत प्रचंड अटीतटीचा ठरला होता.
अल्प मताधिक्याने मिळालेल्या या विजयामुळे मतमोजणी केंद्रावर उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. निकाल जाहीर होताच भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
या विजयामुळे चिंदर मतदारसंघात महायुतीचे राजकीय बळ अधिक बळकट झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक प्रश्न व विकासकामांच्या मुद्यांवर मतदारांनी कौल दिल्याचे चित्र दिसून येत आहे.







