कोमसाप कुडाळ आयोजित विशेष कार्यक्रमात, मालवणच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांना त्यांच्या उल्लेखनीय ‘मंत्रभूल’ या पुस्तकासाठी ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ७ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात साहित्यप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली.
सन्माननीय श्री. रणजीत देसाई यांच्या हस्ते झाला पुरस्काराचा मानकरी गौरव. त्यांच्या हस्ते झालेल्या या सन्मानाने संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली.
कार्यक्रमाला कोमसापचे ज्येष्ठ पदाधिकारी, कोमसाप कविता राजधानी पुरस्कार विजेते व मालवणचे नामांकित उद्योजक रुजारिओ पिंटो, कोमसाप जिल्हाध्यक्ष श्री. मस्के, कोमसाप मालवण अध्यक्ष व पुरस्कारप्राप्त लेखक सुरेश ठाकुर, तसेच अनेक मान्यवर व साहित्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्यिक वैशाली पंडित यांच्या ‘मंत्रभूल’ या ललित लेखसंग्रहाने वाचकांना भुरळ घातली असून, कोकणातील नितळ जीवनदृष्टी, भावविश्व आणि शब्दांचे जादूई सामर्थ्य या पुस्तकात अनुभवायला मिळते.
या सन्मानामुळे कोकणाच्या साहित्य परंपरेला नव्या उंचीचा मुकुट लाभल्याची भावना व्यक्त करण्यात आली.





