मुंबई, दि. ५ : महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने SHEBOX (शीबॉक्स) हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून, सर्व आस्थापनांनी या पोर्टलवर आपल्या कार्यालयाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. मुंबई उपनगरातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांनी तात्काळ SHEBOX पोर्टलवर नोंदणी करून अंतर्गत तक्रार निवारण समितीची व कार्यालयाची अद्ययावत माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (मुंबई उपनगर) श्रीमती एस. टी. कुऱ्हाडे यांनी केले आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ नुसार, १० किंवा त्याहून अधिक अधिकारी-कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांना अंतर्गत तक्रार निवारण समिती (Internal Complaints Committee) स्थापन करणे बंधनकारक आहे. या अधिनियमाच्या कलम १९ अन्वये कार्यालय प्रमुखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, समितीची स्थापना न केल्यास किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास कलम २६ नुसार रुपये ५०,०००/- पर्यंत दंडाची तरतूद आहे.
महिलांना सुरक्षित व सन्मानजनक कार्यस्थळ मिळावे यासाठी सर्व आस्थापनांनी कायद्याचे पालन करून SHEBOX पोर्टलवर आवश्यक नोंदणी व माहिती अद्ययावत करावी, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, दुसरा टप्पा, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई–७१ येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२–२५२३२३०८ तसेच ई-मेल wcdmumupnagar@gmail.com वर संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आ




