मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. मनसेचे नेते आणि कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
संतोष धुरींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्या पुढाकाराने संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 192 आणि 194 या दोन जागांवरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना युबीटी आणि मनसेमध्ये वाद होता. पण या वादावर तोडगा काढत वॉर्ड क्रमांक 192 हा मनसे पक्षाकडे तर वॉर्ड क्रमांक 194 हा ठाकरेंच्या शिवसेनेला युतीमध्ये सोडण्यात आला. पण मनसेकडून वॉर्ड क्रमांक 194 मधून माजी नगरसेवक संतोष धूरी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण आता हा वॉर्ड जागा वाटपात ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यामुळे संतोष धुरी नाराज झाले, तसंच ते काही काळ नॉट रिचेबल झाल्याचीही चर्चा होती.





