खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीवेळी मा. प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण हेही उपस्थित होते. विविध स्थानिक विकासकामांबाबत, पायाभूत सुविधा उभारणी, नगरपरिषदेच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देणे यांसह खेड शहराच्या सर्वांगीण प्रगतीवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
उपनगराध्यक्ष खेडेकर यांनी शहरातील आवश्यक प्रकल्प, नागरिक सुविधांचा विस्तार, रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्थेच्या उन्नतीसंदर्भातील मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी यास सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिल्याचे समजते.
खेडेकर फडणवीस भेटीमुळे खेड शहरातील विकासकामांना नवा वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




