मालवण (प्रतिनिधी) : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय गीतगायन व कथाकथन स्पर्धेत आचरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शानदार कामगिरी केली आहे.
इयत्ता ८वी ते १०वी गटातील गीतगायन स्पर्धेत
- प्रथम क्रमांक — कु. स्वरा अनिरुद्ध आचरेकर
- द्वितीय क्रमांक — कु. कृतिका शिवराम आयर
असे विजेतेपद पटकावले.
कथाकथन स्पर्धेतही आचरा हायस्कूलने आपली छाप कायम ठेवत
- कु. एंजल स्टीफन फर्नांडिस — तृतीय क्रमांक
मिळवला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाचालक, स्थानिक स्कूल समितीचे जे. एम. फर्नांडिस, बाबाजी भिसळे, राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे तसेच सर्व शिक्षकवर्ग व पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







