मालवण, दि. ९ (प्रतिनिधी) : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश इंग्लिश स्कूल, मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील नक्षत्रा परेश जावकर हिने विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.
नक्षत्राने स्पर्धेत उल्लेखनीय खेळी करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिच्या या कामगिरीमुळे तिची पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी नक्षत्राला सौ. स्नेहा चंद्रशेखर बर्वे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
नक्षत्राच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण जी. ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी तिचे अभिनंदन केले असून, विभागस्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.






