मालवण दि प्रतिनिधी
मालवण दांडी आवार परिसरात आज शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे . किरकोळ वादातून सुरू झालेला वाद काही वेळातच उग्र स्वरूप धारण करत दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण झाली.
या गोंधळात पर्यटकांनी स्थानिकांना जबर मारहाण केल्याने वातावरण चिघळले यावेळी पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीची काचही फुटल्याचे समोर आले आहे यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधितांकडून चौकशी सुरू असून नेमका वाद कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे दांडी आवार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.






