मालवण (प्रतिनिधी)
अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कुल, देवबाग या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या प्रशालेतून वैशाली अशोक कुमठेकर हिने ३७९ गुण मिळवीत प्रशालेतून प्रथम क्रमांक पटकाविला. तर हंसिका विष्णू राऊळ हिने ३७८ गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि फाल्गुनी भास्कर देऊलकर हिने ३७५ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रचना रुपेश खोबरेकर आणि प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास येरागी, संस्था सदस्य निलेश सामंत, व सर्व सदस्य, पालक आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.








