मालवण (प्रतिनिधी)
मालवण एज्यूकेशन सोसायटी संचलित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलचा दहावी परीक्षेचा निकाल ९८.५५ टक्के लागला. या प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या १३८ विद्यार्थ्यांपैकी १३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये साक्षी संजय रावराणे हिने ४८९ गुण मिळवीत प्रशालेतून प्रथम क्रमांक पटकाविला.
या प्रशालेतून हर्ष सुहास पांचाळ ४८५ गुण मिळवीत द्वितीय क्रमांक तर रोशन कैलास साळुंके ४८४ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच चौथा क्रमांक – आदित्य समीर बर्डे (४८३ गुण), पाचवा क्रमांक – संस्कृती मंगेश नाईक (४८० गुण), सहावा क्रमांक – फाल्गुनी मिलिंद हिंदळेकर (४७६), सातवा क्रमांक – खुशी हनुमंत तोंडवळकर (४७३), आठवा क्रमांक – वैष्णवी मयूर मोचेमाडकर (४७० गुण), नववा क्रमांक – रुद्र विनायक खानोलकर (४७० गुण), दहावा क्रमांक – कीर्ती संजय बिरमोळे (४६० गुण), अकरावा क्रमांक – निधी विनायक जाधव (४४७ गुण) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण एज्यूकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, पर्यवेक्षक देविदास वेरलकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.








