मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबई संचलित भंडारी ए. सो. हायस्कुलचा इयत्ता दहावीचा निकाल ९८. ७८ टक्के लागला असून तन्वी लक्ष्मण शिंदे ही विद्यार्थिनी ९३.२९ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली.
फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत भंडारी हायस्कुलमधून ८२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या प्रशालेत तन्वी शिंदे ४६६ गुण मिळवून प्रथम तर वेदिका विष्णू बिरमोळे ४६३ गुण मिळवून द्वितीय आली. कौस्तुभ राजन गावडे याने ४४५ गुण मिळवून तृतीय क्रमांक, सियॉन मिल्टन आल्मेडा हिने ४३५ गुण मिळवून चौथा क्रमांक तर कौस्तुभ बाबु सोनवडेकर ४२२ गुण मिळवून पाचवा आला.
या परीक्षेत प्रशालेतील १७ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, ३९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर २ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.








