Students of Bhandari A. So. Junior College, Malvan secured first and second positions in the taluka-level elocution competition organized on the occasion of the Golden Jubilee of Gnyandeep Granthalaya Mandal, Vayangani Panchkroshi.
मालवण (प्रतिनिधी):
ज्ञानदीप ग्रंथालय मंडळ, वायंगणी पंचक्रोशी तालुका मालवण यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवणच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले.
या स्पर्धेत महाविद्यालयातील कु. दिया गोलतकर हिने प्रथम क्रमांक, तर कु. गौरी गराटे हिने द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य तिवले सर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.







