वेंगुर्ला – प्रतिनिधी : राजकिय वर्तुळात सध्या खळबळ उडवून देणारी घडामोड वेंगुर्ले–आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून समोर आली आहे. या मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मनीष दळवी हे या मतदारसंघातील एक ताकदवान आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र तडका-फडकी घेतलेल्या या निर्णयामागचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात असल्याने, कार्यकर्त्यांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. “नेमकं पडद्यामागे काय घडलं?” हा प्रश्न आता प्रत्येकाच्या ओठांवर आहे.
या माघारीचा थेट परिणाम स्थानिक राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी तर काहींमध्ये अस्वस्थता दिसून येत असून, पुढील रणनीती काय असणार याबाबत स्पष्टता नसल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. विरोधकांसाठी ही संधी ठरणार की सत्ताधारी गटाकडून एखादा धक्कादायक निर्णय घेतला जाणार, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.
एकंदरच, मनीष दळवी यांच्या या अनपेक्षित माघारीमुळे वेंगुर्ले–आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. पुढे कोण उमेदवारीच्या रिंगणात उतरणार, नवी आघाडी जुळणार की जुनी समीकरणे बदलणार—याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आ







