मालवण | प्रतिनिधी:
मसुरा एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे या प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ चा निकाल १०० टक्के लागला. कु. चैतन्य भगवान भोगले याने 89.80 मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.सुरज संतोष मसुरकर यांने 85.80 टक्के मिळवत व्दितीय क्रमांक तर कु. नेहा महादेव शिंगरे हिने 83.00 मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला.
मसुरा एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित भरतगड हायस्कूल नं. 2 मसुरे देऊळवाडा या प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला असून कु.श्रेया उमेश परब हिने 72.80 टक्के मिळवत प्रथम क्रमांक, कु. वैष्णवी सुरेश चव्हाण हिने 77.40 टक्के मिळवत व्दितीय क्रमांक तर कु.श्रेया चंद्रशेखर सावंत हिने 50.80 टक्के मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मसुरा एज्युकेशन सोसायटी मुंबई चे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण मुळीक-परब, सचिव श्री. प्रसाद बागवे, लोकल कमिटी अध्यक्ष श्री. राजन परब, सर्व कार्यकारिणी संचालक, तसेच लोकल कमिटी, शाळा समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर, पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी यांचे तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.







