मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील बिळवस येथील माध्यमिक विद्यालय बिळवस या प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या प्रशालेतून रिया रवींद्र पालव हिने ८९ टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला. तर उदय जयराम घाडी याने ८१. ४० टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक आणि पूर्वा संतोष पालव हिने ७२. २० टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सुर्यकांत पालव, सरचिटणीस अशोक पालव, मुख्याध्यापक जयवंत ठाकूर तसेच सर्व संस्था पदाधिकारी, सर्व शाळा समिती सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.







