मालवण (प्रतिनिधी)
भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबई संचालित वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला.
या प्रशालेतून लतिका दीपक सावंत हिने ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तर आयेशा आनंद देसाई हिने ९१. २० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व दर्शना दत्ताराम इंदुलकर हिने ८७. ८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, लोकल कमिटी सचिव दशरथ कवटकर, मुख्याध्यापक श्री. प्रसाद कुबल, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.






