Jay Ganesh English Medium School, Malvan achieved a 100% SSC result with all 45 students passing. Bhakti Damle secured first rank with 94.80% marks.
मालवण (प्रतिनिधी)
मालवण एज्यूकेशन सोसायटी संचालित जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवण चा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भक्ती आनंद दामले हिने ९४. ८० टक्के गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच प्रभाकर दिनेश सुर्वे याने ९३.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर नैनिका महेश कारेकर हिने ९२. ८० टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सुदेश मयेकर, संस्था सचिव विजय कामत व संचालक मंडळ तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. तेजल वेंगुर्लेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.








