मालवण प्रतिनिधी
शासनाचा महसूल विभाग, वन विभागामार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शिवराजस्व समाधान शिबिरात पोईप मंडळ अंतर्गत महसुली गावातील नागरिक व लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे परिपूर्ण स्वरूपात सादर करून महसूल विभागाच्या १५ पेक्षा जास्त योजनांचा जागेवरच लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी पोईप येथे केले.
महसूल विभाग, वन विभाग आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन पोईप मंडळ अधिकारी कार्यालयामार्फत सौ. इंदिरा वर्दम हायस्कूल, पोईप येथे महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, जिल्हा परिषद सदस्या सुमेधा पाताडे, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, पोईप सरपंच श्रीधर नाईक, मसदे चुनवरे सरपंच शमिका वाडकर, हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, राठीवडे सरपंच दिव्या धुरी, शिरवंडे सरपंच श्रीमती घाडीगावकर, वडाचापाट सरपंच सोनिया प्रभुदेसाई, असरोंडी सरपंच पोईपकर, कोळंब मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, पोईप मंडळ अधिकारी संतोष गुरखे, पोईप, शिरवंडे, असरोंडी, असगणी, राठीवडे, हिवाळे, ओवळीये, किर्लोस, वडाचापाट, मसदे चुनवरे, आंबवणे या गावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, पोलीस पोलीस पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी ऐश्वर्या काकुसे म्हणाल्या की, शासनाच्या या अभियानाअंतर्गत नागरिकांची महसूल विभागातील कामे तत्परतेने व्हावीत, विद्यार्थ्यांना दाखले, नागरिकांच्या जमिनी नोंदी व इतर प्रलंबित कामांबाबत महसूल कर्मचाऱ्यांनी दिरंगाई न करता प्रत्येक प्रकरणाची त्वरित अंमलबजावणी करून नागरिकांना शासनाच्या सोयीसुविधांचा पुरेपूर लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रयत्नशील राहवे, असे आवाहन त्यांनी केले.

तहसीलदार गणेश लव्हे यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांबाबत उपस्थित नागरिक लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात इंदिरा आवास योजनेतील पूर्ण झालेल्या घरकुलाची चावी अधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आली. उत्पन्न दाखला, शिधापत्रिका, मृदसंधारण दाखला व विविध स्वरूपातील दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यानिमिताने नागरिकांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात आल असून आले असून त्या-त्या क्षेत्रातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांनी केले.
महसूल विभागाच्यावतीने टेबल लावून जागेवरच कागदपत्रांची पडताळणी व छाननी करून लाभार्थ्यांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी पोईप हायस्कूलमध्ये शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात रजिस्ट्रार श्री.हिंदळेकर व राठिवडे गावचे विद्यमान शेतकरी तसेच भारतीय नौदलाचे भूतपूर्व प्रशासकीय अधिकारी बाळप्रकाश अंकुश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर परब-हिंदळेकर यांनी केले







