मालवण (प्रतिनिधी)
मालवण रेवतळे येथे राहणारी वैष्णवी अभय जोशी (वय २०) ही युवती दि. २५ एप्रिल पासून बेपत्ता झाली आहे. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत तीच्या वडिलांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे. त्यानुसार २५ एप्रिल रोजी सकाळी ६. ३० वाजण्याच्या सुमारास वैष्णवी ही घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. नातेवाईकांकडे चौकशी केली असता ती सापडून आली नाही तसेच अद्यापपर्यंत घरी परतलेली नाही. तिने पंजाबी ड्रेस व जीन्स पॅन्ट परिधान केली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर हे अधिक तपास करत आहेत.








