मालवण (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघ व दैवज्ञ हितवर्धक समाज, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दैवज्ञ भवन, मालवण येथे मौजीबंधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण १० बटुंचे विधिवत मौजीबंधन करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. विवेक रायकर, श्री. उमेश नेरुरकर, श्री. राजेश पनवेलकर, श्री. मोहन तळगांवकर, प्रा. सुभाष गोवेकर, श्री. दयानंद मोंडकर, श्री. मंगलदास साळगावकर, श्री. अरविंद सराफ यांच्यासह जिल्ह्यातील समाजबंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजीबंधन सोहळा पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक विधींनी पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दैवज्ञ हितवर्धक समाज, मालवणच्या सर्व बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे समाजात एकात्मता आणि परंपरेचे जतन करण्याचा संदेश दिला गेला.








