मालवण दि प्रतिनिधी
फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कट्टा येथील वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या स्कुलमधील अनुष्का उमेश देसाई या विद्यार्थिनीने ५१७ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
या स्कुलमध्ये बारावी परीक्षेसाठी विज्ञान शाखेतून ८४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या स्कुल मधून मुग्धा रामदास गोसावी ही ४९९ गुण मिळवीत द्वितीय तर चिन्मयी रामकृष्ण सामंत ही ४८२ गुण मिळवून तृतीय आली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त), अॅड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव-सुनील नाईक, विजयश्री देसाई, स्कूल कमिटी चेअरमन श्री. सुधीर वराडकर व इतर सन्मानीय संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक श्री. हृषीकेश नाईक यांनी अभिनंदन केले.







