पोईप (वार्ताहर)
पोईप विरण येथील सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यामध्ये वाणिज्य शाखेतून प्रथम – दिव्या संतोष घाडीगावकर (४९५), द्वितीय – नितीशा शैलेश परब (४१५), तृतीय – गुरुराज मंगेश महाजन (४०७) यांनी यश मिळविले. तर कला शाखेतून प्रथम – पूजा चंद्रशेखर परकर (३३९), द्वितीय – आदित्य विलास मेस्त्री (३१४), तृतीय – निशांत योगेंद्र परब (२४६) यांनी यश मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, सर्व विद्यमान संचालक, प्राचार्य/ मुख्याध्यापक श्री. कुंभार, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.








