The government has taken a major step to increase transparency in LPG distribution by expanding the Delivery Authentication Code (DAC) system to cover 90% of customers. Cylinder delivery will now be confirmed only after verifying the one-time code sent to the customer’s registered mobile number.
एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात केंद्र सरकारने सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, ग्रामीण भागात आता 45 दिवसांनंतरच एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचे अंतर ठेवून बुकिंग करता येईल. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत ही माहिती दिली आहे.
एलपीजी वितरणात पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आलं आहे. डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) प्रणालीचा विस्तार करून आता 90 टक्के ग्राहकांचा त्यात समावेश केला जाणार आहे. ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेल्या वन-टाइम कोडची पुष्टी केल्याशिवाय सिलेंडर डिलिव्हर झाल्याची नोंद होणार नाही. मागणी नियंत्रणासाठी नवीन नियमही लागू करण्यात आला आहे. शहरी भागात एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये किमान 25 दिवसांचं अंतर अनिवार्य असणार आहे, तर ग्रामीण आणि दुर्गम भागात 45 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे.






