मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन आयोजित व नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन नियोजित ७६ व्या ज्युनिअर राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक ३१/३/२०२६ ते शनिवार दिनांक ४/४/२०२६ या कालावधीत मिनाताई ठाकरे स्टेडियम आसगाव नाका ,नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले व मुली असे दोन संघ सहभागी होतील. या संघाची निवड चाचणी सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूल, वायरी मालवण येथील बास्केटबॉल कोर्टवर आयोजित करण्यात आली आहे…
सिंधुदुर्ग जिल्हा ज्युनिअर बास्केटबॉल संघ निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन मालवण यांच्या वतीने निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे…
सदर स्पर्धेसाठी १ जानेवारी २००८ किंवा त्यानंतर जन्मलेल्या खेळाडूंचीच पात्रता राहणार आहे. निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी मूळ जन्मदाखला, आधारकार्ड तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.अधिक माहीतीसाठी सचिव अजय शिंदे ९४२२३९४१८६ या क्रमांकावर संपर्क साधावा..
जिल्ह्यातील सर्व पात्र बास्केटबॉल खेळाडूंनी वेळेत उपस्थित राहून निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे…







