मालवण : दि. प्रतिनिधी
शिवजयंतीनिमित्त आचरा येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व सहकार्याने आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाचा लाभ बहुसंख्य नेत्ररुग्णांनी घेतला.
शिबिराचे उद्घाटन आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी तसेच रामेश्वर सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जयप्रकाश परुळेकर, रुपेश पाटकर, अभय भोसले, चावल मुजावर, मांगिरीष सांबारी, पंकज आचरेकर, चंदू कदम, महेंद्र घाडी, विजय कदम, उदय घाडी, श्रीपाद सावंत, दिलीप कावले, आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, मंगेश मेस्त्री, दिपक आचरेकर (तोंडवळी तळाशिल) येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच डॉ. विपूल गांधी, निलेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी व पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांच्या सहकार्याने शिवसेना तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नेत्रतपासणीसह आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





