‘आनंद निर्मितीचा, वसा पर्यावरण रक्षणाचा’ संकल्पना; नगरपंचायतीतर्फे आयोजन
कणकवली, दि. ११ सप्टेंबर (प्रतिनिधी) : ‘आनंद निर्मितीचा, वसा पर्यावरण रक्षणाचा’ या संकल्पनेतून कणकवली नगरपंचायतीतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. कणकवली शहरातील नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
ही स्पर्धा केवळ कणकवली शहरातील नागरिकांसाठी असून १५ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्ट आणि रील्सच स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची पोस्ट किंवा रील स्वतःच्या फेसबुक अथवा इन्स्टाग्राम खात्यावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
स्पर्धकांनी कणकवली नगरपंचायतीच्या अधिकृत फेसबुक पेज Kankavali Nagarpanchayat किंवा इन्स्टाग्राम पेज kankavalinp ला फॉलो करून टॅग करणे बंधनकारक आहे. तसेच #majhivasundhara, #MissionLife, #swachhsurvekshan2026, #3R आणि #Kankavalinagarpanchayat हे हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे.
शाडू मातीच्या गणेशमूर्तीला प्राधान्य
स्पर्धेसाठी गणेशमूर्ती संपूर्णपणे पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. मूर्तीसाठी केवळ शाडू माती, शेतमाती किंवा नैसर्गिक मातीचा वापर केलेला असावा. गणेशोत्सवातील सजावटही नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याच्या माध्यमातून केलेली असावी.
सजावटीमध्ये थर्माकोल, पीओपी, प्लास्टिक किंवा अन्य अविघटनशील साहित्याचा वापर करता येणार नाही. एकल वापराच्या प्लास्टिकचा वापरही टाळणे आवश्यक आहे.
सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटीला विशेष प्राधान्य
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, 3R संकल्पना तसेच विविध सामाजिक विषयांवर आधारित पर्यावरणपूरक सजावटीला स्पर्धेत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्राप्त झालेल्या पोस्ट व रील्समधून १० आकर्षक पर्यावरणपूरक पोस्ट/रील्सची प्राथमिक निवड करण्यात येईल. त्यानंतर संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अंतिम तीन विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मान
स्पर्धेतील विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत :
- प्रथम क्रमांक : ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- द्वितीय क्रमांक : ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- तृतीय क्रमांक : २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
याशिवाय उत्तेजनार्थ निवड होणाऱ्या पाच स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचा निकाल अनंत चतुर्दशीच्या दिवशी कणकवली नगरपंचायतीच्या अधिकृत फेसबुक







