मालवण तालुकास्तरीय स्पर्धेत सानिका ठाकूर प्रथम; भावेश कुबल तृतीय, हर्षिता तारी चतुर्थ
मालवण, दि. प्रतिनिधी : मालवण तालुकास्तरीय १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे.
या स्पर्धेत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता ११वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी सानिका अमित ठाकूर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. इयत्ता ११वी विज्ञान शाखेतील भावेश रामचंद्र कुबल याने तृतीय क्रमांक, तर इयत्ता ११वी वाणिज्य शाखेतील हर्षिता महेश तारी हिने चतुर्थ क्रमांक मिळविला.
या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे सानिका अमित ठाकूर, भावेश रामचंद्र कुबल आणि हर्षिता महेश तारी या तिन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.







