मालवण (प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने मालवण तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी, जय शिवाजी!” अशा जयघोषात लेझीम नृत्य, ढोल-ताशांचा गजर, भगव्या शाली, झेंडे व फेट्यांनी सजलेल्या मिरवणुकीसह शिवसैनिकांनी किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर गाठले.
कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेले छत्रपतींचे ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिर हे जिल्ह्याचे श्रद्धास्थान असून, शिवसेनेतर्फे दरवर्षी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून, मंदिरात दगडात कोरलेले आकर्षक सिंहासन उभारण्यात आले आहे. यावेळी वैभव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले आणि जिल्हावासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पुजारी श्री. सकपाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, प्रा. मंदार सावंत, नितीन राऊळ, किल्ला रहिवाशी मंगेश सावंत, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, तळगाव सरपंच लता खोत,रेवंडी सरपंच अमोल वस्त, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत,नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, अमित भोगले, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, राहुल सावंत,उदय दुखंडे, सचिन रेडकर,संजना रेडकर,कृष्णा आंगणे,दिनेश चव्हाण, गौरी मयेकर, राधिका मोंडकर, माधुरी प्रभू, मनोज मोंडकर,हेमंत मोंडकर,उमेश मांजरेकर, महेश शिरपुटे, निलेश दुधवडकर, साक्षी कोंडरकर, राजू मेस्त्री, भावेश कांबळी, संजय कांबळी,सिद्धेश मांजरेकर, राजू नार्वेकर, महेश शिरपुटे, रूपा कुडाळकर, बाप्पा वायंगणकर, किशोर गावकर,चिंतामणी मयेकर,गजा नेवाळकर,प्रत्यूश भोगले, संतोष अमरे,सोनाली डिचवलकर,बबन वाघ,निलेश केळुसकर,आबा केळुसकर,रवी तळाशिलकर,स्वप्नील आचरेकर, समीर लाड, गजा नेवाळकर,राका रोगे,राहुल जाधव, कल्पेश रोगे, नारायण कुबल, सुनील माळकर,सुधाकर वायंगणकर, चंद्रकांत घाडीगावकर, विलास तांडेल अमृता मयेकर, विजया तांडेल, संतोष सावंत,बबन दुखंडे,बाबल पडवळ,सुरज आचरेकर,दिनेश कांबळी,मेघना कांबळी, अनिरुद्ध पोयरेकर,प्रशांत कांबळी, गणेश घोगळे,संतोष कांबळी,शौर्या कांबळी, दत्ता पोईपकर,अरुण परब आदींसह किल्ला रहिवाशी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







