मुंबई : स्वामीराज प्रकाशन तर्फे प्रकाशित झालेले “ध्येयधुंद” हे पुस्तक प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी अक्षरशः गाजले. ज्येष्ठ नेते सुरेश प्रभू यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला देशभरातील प्रभू यांचे चाहते, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाल्याने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
लेखक नकुल पार्सेकर यांनी “ध्येयधुंद”मधून सुरेश प्रभू यांच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक प्रवासाचे प्रभावी चित्रण केले आहे. त्यांच्या कार्याचा ठसा, धोरणात्मक निर्णयांची पार्श्वभूमी आणि व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू पुस्तकात उलगडले आहेत. त्यामुळेच वाचकांकडून या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
प्रकाशनानंतर अवघ्या काही तासांतच पुस्तकाची पहिली आवृत्ती Out of Stock झाली. विक्रीचा वेग पाहता प्रकाशकांनी तातडीने दुसऱ्या आवृत्तीची छपाई सुरू केली असून ती सध्या छपाईखान्यात आहे.
भव्य, दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे “ध्येयधुंद”ने मराठी वाचकविश्वात आपली ठळक नोंद केली आहे. प्रेरणादायी जीवनकथांमध्ये रस असणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण ठेवा ठरत आहे.







