Guardian Minister Nitesh Rane performed the groundbreaking ceremony of Maratha Cultural Bhavan and Art Gallery in Kankavli on Shiv Jayanti and assured full government funding for the project.
कणकवली – शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर आज कणकवली येथे मराठा सांस्कृतिक भवन व कलादालन तसेच उद्यानाच्या उभारणीचा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या हस्ते पार पडला
कणकवली नगरपंचायत निवडणुकीदरम्यान मराठा समाजाने मराठा भवनाची मागणी केली होती. शिवजयंतीच्या दिवशी दिलेला शब्द पूर्ण करताना अभिमान वाटत असल्याचे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
या भवनासाठी आवश्यक असणारा सर्व निधी शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.आज भूमिपूजन झालेल्या या सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन पुढील शिवजयंतीला आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष, विविध पदाधिकारी तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







