मालवण | दि. प्रतिनिधी
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या ‘गणित प्राविण्य’ परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल, कट्टा च्या इयत्ता ५ वी मधील विद्यार्थिनी कु. शुभ्रा राजन नाईक हिने ‘विशेष प्राविण्य’ मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. या यशामुळे शुभ्रा नाईक हिला पुढील ‘गणित प्रज्ञा’ परीक्षेसाठी पात्रता मिळाली आहे.
शुभ्रा हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी तिचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभ्रा हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनीच्या या यशामुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी ‘गणित प्रज्ञा’ परीक्षेतही ती उत्तुंग यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.







