मुंबई | प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे संपन्न झाले. ,
सार्वजनिक जीवनातील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना सुरेश प्रभू यांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांच्या ध्येयवादी वाटचालीचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे. प्रशासन, धोरणनिर्मिती आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणाऱ्या त्यांच्या कारकिर्दीचे विविध पैलू पुस्तकात मांडण्यात आले आहेत.
या प्रकाशन सोहळ्यास उमा प्रभू, अमेय प्रभू, डॉ. अमेय देसाई तसेच पुस्तकाचे लेखक नकुल पार्सेकर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सुरेश प्रभू यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानावर प्रकाश टाकला.
‘ध्येयधुंद’ हे पुस्तक त्यांच्या वैचारिक प्रवासासह नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेच्या ध्यासाची ओळख करून देणारे ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा शिवजयंतीचे औचित्य साधून गुरूवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक अकरा वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह शिवाजी पार्क दादर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.







