मालवण (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब मालवणच्या वतीने वायरी येथील रेकोबा हायस्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हायस्कूल तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना लायन्स क्लबच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभूलकर, जयश्री हडकर, राजा शंकरदास, शांती पटेल, मिताली मोंडकर, उमेश शिरोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी रेकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांच्यासह श्री. फणसेकर, श्री. कोरे, श्री. कुबल, सौ. मिताली मोंडकर, सौ. रोहिणी दिघे, सौ. अदिती शेर्लेकर, श्री. डगरे तसेच दत्ता गोसावी, यशवंत गांवकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लायन्स क्लब मालवणच्या वतीने सन्मान करण्यात आला.
शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.







