In the presence of guardian minister Nitesh Rane, a detailed review meeting was held on the proposal to set up Sindhudurg’s first 5-star hotel by Taj Group.
मुंबई- सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीस चालना देण्याच्या दृष्टीने ताज समूहाच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिले ‘५ स्टार हॉटेल’ उभारण्याचा प्रस्ताव असून, या महत्त्वपूर्ण प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात राज्याचे मत्स्यव्यवसाय बंदरविकास तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सविस्तर आढावा बैठक पार पडली.
राज्याचे पर्यटन मंत्री श्री.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी दि इंडियन हॉटेल लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीस होणाऱ्या विलंबाच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत सदर प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच प्रलंबित बाबींची चर्चा करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या स्पष्ट सूचना मंत्री नितेशजी राणे यांनी दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण होऊन पर्यटनवाढीसह स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे यावेळी यावेळी मंत्री नितेशजी राणे यांनी अधोरेखित केले. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव श्री.संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.निलेश गटणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे आदी उपस्थित होते.







