श्री सत्यनारायण महापूजा आणि भजनसेवेचा भक्तिमय सोहळा गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी चिंदर–सडेवाडी येथील जरेचा वड येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या दिवशी सकाळी ठीक १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ७ वाजता सुस्वर भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९.३० वाजता प्रसिद्ध भजनप्रेमी स्व. अनिल जयंंत हडकर आणि राजा बैल यांच्या स्मरणार्थ भजनसेवा आयोजित करण्यात आली आहे. या भजनसेवेत बुवा – श्री विजय (गुंडू) सावंत, बुवा – श्री संदीप लोके तसेच बुवा – श्री संदीप पुजारे सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व जरेचा वड उत्सव समितीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







