Shiv Sena star campaigner and MLA Nilesh Narayanrao Rane cast his vote at Varwade polling booth in Kankavli for Sindhudurg Zilla Parishad and Panchayat Samiti elections and appealed citizens to vote.
कणकवली (प्रतिनिधी):
शिवसेनेचे स्टार प्रचारक व आमदार सन्माननीय निलेशजी नारायणराव राणे साहेब यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातील वरवडे येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी बोलताना राणे साहेब म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तसेच नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या संस्थांमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन येण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बंधू-भगिनींनी आपला मौल्यवान मतदानाचा हक्क आवर्जून बजवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान होणे आवश्यक असून, नागरिकांचा सक्रिय सहभागच सक्षम प्रशासन घडवू शकतो, असे मत राणे साहेबांनी व्यक्त केले.








