Shiv Sena district chief Datta Samant targets rivals at Poip campaign meeting, urges voters to reject corruption and elect Zilla Parishad candidate Sumedha Patade and Panchayat Samiti candidate Pragya Bhau Chavan for development-focused leadership.
पोईप | प्रतिनिधी :
“ज्यांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून गावाला गंडा घातला, कागदावरच विकास दाखवून ग्रामपंचायतीचा कारभार बिघडवला आणि गावाची बदनामी केली, अशा सोम्या-गोम्यांच्या नादी लागाल तर विकासकामांना मुकाल,” असा जोरदार इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पोईप येथील गोळवण कुमामे नाक्यावरील प्रचार सभेत दिला. कायद्याने दोषी ठरवून पदावरून हटवण्यात आलेल्या व्यक्तींना पुन्हा संधी देऊ नका, असे आवाहन करत त्यांनी जिल्हा परिषद उमेदवार सौ. सुमेधा पाताडे आणि पंचायत समिती उमेदवार सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
भ्रष्टाचाराला नकार; विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन
सभेत बोलताना दत्ता सामंत म्हणाले की, काही मंडळी पुन्हा आपल्या भ्रष्ट कारभाराचे जाळे उभे करण्यासाठी वेगवेगळे डावपेच खेळत आहेत. गावाच्या हिताऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी कारभार करणाऱ्यांना मतदारांनी ठाम नकार द्यावा. खरे विकासकामे प्रत्यक्षात गावात उतरवणाऱ्या उमेदवारांनाच संधी द्या, असे त्यांनी मतदारांना आवाहन केले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे हेच खरे विकासाचे मोजमाप असल्याचे त्यांनी नमूद केले.
उमेदवारांनी मांडला विकासाचा आराखडा
यावेळी माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, उमेदवार सौ. सुमेधा पाताडे आणि सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केले. स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, शेतकरी व ग्रामस्थांसाठी आवश्यक सोयीसुविधा यावर भर देण्याची भूमिका उमेदवारांनी मांडली. निवडून आल्यानंतर पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विजयाची ग्वाही
सभेअंती उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांनी दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचा समारोप भाऊ चव्हाण यांच्या आभारप्रदर्शनाने झाला. सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिल्याने प्रचाराला उत्साहाचे वातावरण दिसून आले.
विविध गावांत प्रचार बैठका
दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली पोईप, खोटले, हेदुळ, डिकवल, नांदोस आदी गावांत प्रचार बैठका घेण्यात आल्या. या बैठकींत स्थानिक प्रश्नांवर चर्चा करत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. प्रचारादरम्यान महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद कार्यकर्त्यांत आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे.
उपस्थित मान्यवर
यावेळी दत्ता सामंत, अनिल कांदळकर, तालुका प्रमुख मंदार लुडबे, उमेदवार सौ. सुमेधा पाताडे, सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण, मेघना गावडे, मुरारी गावडे, सुमीत गावडे, भालचंद्र गावडे, संदीप गावडे, प्रवीण शिरवलकर, दयाळ राणे, रमेश गावडे, जनार्दन गावडे, रूपा दुखंडे, प्रल्हाद नाईक, अशोक चव्हाण, नवनित चव्हाण, बाळा गावडे, नंदू नाईक, प्रकाश नाईक, आनंद चव्हाण, राजू गावडे तसेच पदाधिकारी राजेंद्र प्रभुदेसाई, पंकज वर्दम, संदीप सावंत, बाबुराव चीरमुले, कमलेश प्रभु, बाबु तेली, तुकाराम जाधव, बाळकृष्ण खरात, प्रशांत परब, दादा गावडे, विकास गावडे, दिगंबर गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







