महाराष्ट्रया
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर अवघा महाराष्ट्र आज हळहळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा अपघात नसून घातपात असल्याची राजकीय टिका टिप्पणीही सुरू झली आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते आणि पवार कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य शरद पवार यांनी माध्यमांसमोर या मृत्यूनंतर राजकारण करू नका असे आवाहन केले आहे.
शरद पवार म्हणतात.
“अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.
मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.”







