मालवण | प्रतिनिधी – मालवण येथील टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे टोपीवाला हायस्कूल तसेच मालवण एज्युकेशन सोसायटीशी संलग्न इतर शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शुक्रवार, १७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या स्नेहमेळाव्यात संघटनेचा वार्षिक अहवाल व कार्यपद्धती याबाबत माहिती दिली जाणार असून, याच वेळी एमव्हीएस (MVS)च्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात येणार आहे. माजी विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा स्नेह, आठवणी व संवादाचे व्यासपीठ ठरणार आहे.
या मेळाव्यासाठी प्रत्येकी १०० रुपये वर्गणी निश्चित करण्यात आली आहे. शाळेतील व्यं. ह. सांगावकर ज्ञानमंदिर या इमारतीतील माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत वर्गणी भरून नाव नोंदवता येणार आहे. तसेच ९५२९७८६७८१ या क्रमांकावर संपर्क साधूनही नाव नोंदणी करता येईल.
अधिक माहितीसाठी रघुनाथ शेवडे (९४२११४५६९९), नंदन देसाई, डॉ. अश्विन दिघे किंवा प्रमोद मोहिते यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आले आहे. माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्नेहमेळावाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.





