आर. ए. यादव हायस्कूल, आडवली येथे झालेल्या महत्त्वपूर्ण सभेमध्ये ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात येणाऱ्या “शाळा वाचवा – शिक्षण वाचवा” महामोर्चात आडवली व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असा ठोस निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वांचा प्रवास शिस्तबद्ध, सुरक्षित व सुलभ व्हावा, या उद्देशाने सविस्तर वाहतूक नियोजन निश्चित करण्यात आले आहे.
या महामोर्चामध्ये अंदाजे ३०० पेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असून, त्यासाठी उपस्थितीची वेळ व ठिकाण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
सोमवार, दिनांक ०५/०१/२०२६ रोजी सकाळी ठीक ८.४५ वाजता आर. ए. यादव हायस्कूल, आडवली येथे सर्व ग्रामस्थांनी एकत्र जमायचे आहे.
गावनिहाय वाहतूक व्यवस्थेनुसार पळसंब गावातून सकाळी ८.३० वाजता एक बस रवाना होणार आहे. तर श्रावण परिसरातून येणाऱ्यांसाठी सकाळी ८.३० वाजता टेम्पो ट्रॅव्हलर उपलब्ध असून, एक टेम्पो ट्रॅव्हलर श्रावण – गवळीवाडी मार्गे जाणार आहे.ओरोस येथे जाण्यासाठी २ एस.टी. बसेस, ४ टेम्पो ट्रॅव्हलर, तसेच आडवली रिक्षा संघटनेच्या वतीने ७ मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सर्व सहकार्यामुळे महामोर्चात मोठ्या संख्येने, शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने सहभाग नोंदवता येणार असल्याचा विश्वास सभेमध्ये व्यक्त करण्यात आला. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती व वाहनमालकांचे सभेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.





