शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त), कट्टा येथील सन १९८१–१९८२ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत प्रशालेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यावर्षी आपला शताब्दी महोत्सव साजरा करत असून, या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आज देश-विदेशात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र आणून आपुलकीचा स्नेहमेळावा आयोजित करण्याचा संयुक्त उपक्रम कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाकडून राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सन १९८१–१९८२ दहावी बॅचचे विद्यार्थी उद्या, शनिवार दिनांक ३ जानेवारी रोजी कट्टा येथे एकत्र येणार आहेत. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.
तरी सन १९८१–१९८२ दहावी बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





