मालवण नगरपरिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पुढाकारातून ठाकरे शिवसेनेच्या वतीने नववर्षानिमित्त ख्रिस्ती बांधवांना कॅलेंडरचे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.
नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ख्रिस्ती समाजातील नागरिकांशी संवाद साधत त्यांना सदिच्छा देण्यात आल्या. विविध समाजघटकांमध्ये सौहार्द, एकोप्याची भावना जपणे हेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धोरण असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शिवसेना उबाठा पक्षाच्या नगरसेविका अनिता गिरकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगूत, शहरप्रमुख बाबी जोगी, रवी मिटकर, काँग्रेसचे शहरप्रमुख जेम्स फर्नांडीस यांच्यासह अन्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नववर्षाच्या निमित्ताने मिळालेल्या या सदिच्छा आणि आपुलकीमुळे ख्रिस्ती बांधवांनीही समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.





