मुंबई | विद्यार्थ्यांच्या अबॅकस व मानसिक गणितातील असामान्य कौशल्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ देणारी BrainBuild Abacus & Mental Maths – BATTLE OF CHAMPIONS 2025 ही भव्य स्पर्धा 21 डिसेंबर 2025 रोजी मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
या राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या विविध राज्यांतील एकूण 536 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील मुख्य टप्प्यात विद्यार्थ्यांनी अवघ्या 8 मिनिटांत 200 गणिती उदाहरणे सोडवण्याचे आव्हान स्वीकारले. त्यानंतर झालेल्या Listening Competition मध्ये मौखिक पद्धतीने दिलेली उदाहरणे काही सेकंदांत मनाने सोडवून विद्यार्थ्यांनी आपले विलक्षण मानसिक गणित कौशल्य सिद्ध केले.
या कठीण आणि स्पर्धात्मक लढतीतून 248 विद्यार्थ्यांनी विजेतेपदाची चषके पटकावली, तर अनेक विद्यार्थ्यांना विविध गटांत गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विश्वंभर जाधव (संशोधक व शारीरिक शिक्षण प्रशिक्षक) आणि मा. श्री. लक्ष्मण धुळेकर (मत्स्यव्यवसाय आयुक्त) उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, शिस्त आणि उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील सर्वोच्च क्षण ठरला Senior Grand Champion आणि Junior Grand Champion पुरस्कार वितरणाचा—
🏅 Senior Grand Champion – कु. सान्वी कोळी
148 अचूक उदाहरणे | गुण: 1053 | स्तर: 5
🏅 Junior Grand Champion – कु. तय्यबा खान
183 अचूक उदाहरणे | गुण: 1025 | स्तर: 2
सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल, चेंबूर येथील विद्यार्थ्यांनी Miss & Master BrainBuild 2025 हे मानाचे किताब पटकावले—
🥇 Master BrainBuild – हर्ष कुमार
175 उदाहरणे | गुण: 960
🥇 Miss BrainBuild – आयझा शेख
169 उदाहरणे | गुण: 928
याशिवाय 8 Champion of Champions, 15 Champions, तसेच 1st ते 4th Runner-Up आणि 95 Merit विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
ही संपूर्ण स्पर्धा BrainBuild Abacus Pvt. Ltd. या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. संस्था श्री. अश्वथ शेट्टी, श्रीमती अनीता मदूर आणि श्रीमती वैशाली शास्त्री या तीन अनुभवी व युवा संचालकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद व स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन करत कार्यक्रम अत्यंत यशस्वी केला आणि विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही आनंददायी वातावरण निर्माण केले.
“आयुष्यभर उपयोगी पडणारी कौशल्ये घडवणे” हे BrainBuild चे ब्रीदवाक्य असून, मानसिक गणित व अबॅकस शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन अधिक सुलभ, आत्मविश्वासपूर्ण आणि यशस्वी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.





