मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल येथे उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए.सो. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मालवणच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही गटांत उल्लेखनीय सहभाग नोंदवत यश संपादन केले आहे.

या विज्ञान प्रदर्शनांत प्रतिकृती, निबंध लेखन, वकृत्व, प्रश्नमंजुषा तसेच शिक्षक शैक्षणिक साहित्य अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. माध्यमिक गटातील निबंध लेखन स्पर्धेत कु. सिद्धी जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावून प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच माध्यमिक गटातील शिक्षक शैक्षणिक साहित्य स्पर्धेत श्री. अवसरे एस. ए. यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना व सहभागी शिक्षकांना मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आयबीटी (IBT) विभागातील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.





