मुंबई (प्रतिनिधी)
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा–शिवसेना युतीमधील जागावाटपाबाबत आज दादर येथील शिवसेना पक्ष कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित राहून जागावाटप व निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीस शिवसेनेकडून शिवसेना उपनेते तथा माजी खासदार राहुल शेवाळे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे तसेच आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते. तर भाजपाकडून मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांच्यासह मंत्री आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, महाराष्ट्र समूह स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर तसेच रयांनी सहभाग घेतला.
या बैठकीत मुंबईतील प्रभागनिहाय स्थिती, युतीतील समन्वय, तसेच निवडणूक काळात संयुक्तपणे राबवायच्या प्रचार यंत्रणेवर विचारमंथन करण्यात आले. आगामी निवडणूक लढवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे सज्ज असून, मुंबईत युती अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीनंतर जागावाटपाबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.





