मालवण | प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठ अंतर्गत झोन क्रमांक चार यांच्या वतीने १ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाची विद्यार्थिनी कु. अनुष्का चंद्रशेखर आंबेरकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत २०० मीटर धावणे स्पर्धेत ब्राँझ पदक पटकावले.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कठीण स्पर्धकांशी सामना करत कु. अनुष्का हिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिच्या या यशामुळे महाविद्यालयासह मालवण तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात गौरव वाढला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, जिमखाना विभागप्रमुख, क्रीडा शिक्षक, प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कु. अनुष्का आंबेरकर हिचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





