मुंबई : एक टनापेक्षा जास्त वजनाच्या मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस किंवा स्थैर्यता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याचा दावा खोटा असल्याचे राज्य सरकारच्या DGIPR Fact Checkकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेने गणेशमूर्तींसाठी स्थैर्यता प्रमाणपत्र अनिवार्य करण्याबाबत कोणताही निर्णय किंवा आदेश जारी केलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक असल्याची माहिती चुकीची आहे.
तसेच गणेशमूर्ती तयार करण्यापासून त्या मंडपात पोहोचेपर्यंतची संपूर्ण कागदपत्रे सादर करण्याची सक्तीही करण्यात आलेली नाही, असे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून प्रसारित होत असलेल्या या दाव्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, तसेच अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







