मुंबई : YouTube Partner Program (YPP) मध्ये १ फेब्रुवारी २०२७पासून मोठे बदल होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर चर्चेत आहे. नव्या क्रिएटर्सना YPP मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी Watch Hours, Shorts Views आणि Subscriber याबाबतचे निकष अधिक स्पष्ट करण्यात आल्याचे या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
नवीन नियमांनुसार, YPP साठी पात्र होऊ इच्छिणाऱ्या नव्या YouTube चॅनेल्सना गेल्या ३६५ दिवसांत ८ हजार तास Watch Hours किंवा गेल्या ९० दिवसांत २ कोटी Shorts Views, तसेच किमान १ हजार Subscribers पूर्ण करावे लागतील. यापूर्वी Watch Hoursचा निकष ४ हजार तास आणि Shorts Viewsचा निकष १ कोटी असल्याचे नमूद करण्यात आले होते.
Shorts Creators साठीही महत्त्वाचे बदल
Shortsमधून कमाई करू इच्छिणाऱ्या क्रिएटर्ससाठी गेल्या ९० दिवसांत किमान १ कोटी Qualified Shorts Views मिळवणे आवश्यक असल्याचे या माहितीत म्हटले आहे. १ कोटी Viewsचा टप्पा पूर्ण न झाल्यास Shortsची कमाई तात्पुरती थांबू शकते; मात्र Long-form व्हिडिओंच्या कमाईवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
१० दशलक्ष Shorts Viewsचा टप्पा पुन्हा पूर्ण झाल्यानंतर Shortsमधून कमाई सुरू होऊ शकते, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
YPPमध्ये Active राहण्यासाठीही अट
YouTube Partner Programमध्ये सहभागी असलेल्या चॅनेलने Active राहण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक असल्याचे पोस्टमध्ये नमूद आहे. त्यामध्ये वर्षाला १ हजार तास Watch Time, किंवा ९० दिवसांत १० लाख Shorts Views, अथवा ९० दिवसांत किमान दोन Long-form व्हिडिओ किंवा पाच Shorts अपलोड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
Status गमावल्यास पुन्हा संधी
चॅनेल YPPच्या Active श्रेणीतून बाहेर गेल्यास पुन्हा YPP Status मिळवण्यासाठी ९० दिवसांचा Extension Period मिळेल, असेही या माहितीत म्हटले आहे. या कालावधीत १ हजार Watch Hours किंवा १० लाख Shorts Views पूर्ण करून चॅनेल पुन्हा Active करता येईल, असा दावा करण्यात आला आहे.
मात्र, हे नियम YouTubeकडून अधिकृतपणे जाहीर झाले आहेत का, याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे क्रिएटर्सनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी YouTubeच्या अधिकृत YPP आणि Monetization मार्गदर्शक सूचना तपासाव्यात.








