मुंबई : मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांसाठी स्थानिक सुट्टीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोपाळकाला अर्थात दहीहंडीऐवजी आता रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेश जारी केला आहे. यापूर्वी ५ सप्टेंबर २०२६ रोजी गोपाळकाला (दहीहंडी) निमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंनासाठी स्थानिक सुट्टी देण्यात आली आहे.
हा निर्णय मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे.
त्यामुळे मुंबईतील संबंधित शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या सुट्टीच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, सामान्य प्रशासन विभागाच्या शासन आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
दहीहंडीची ५ सप्टेंबरची सुट्टी रद्द करून रक्षाबंधनाची सुट्टी लागू करण्याच्या या निर्णयामुळे मुंबईतील शासकीय कार्यालयांच्या सुट्टीच्या यादीत महत्त्वाचा बदल झाला आहे.







